फिजी शुगर कार्पोरेशनचे भान सिंह नवे सीईओ

91

फिजी शुगर कार्पोरेशनने भान प्रताप सिंह यांना नवे सीईओ म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. ते ग्रॅहम क्लार्क यांच्या जागी कार्यभार सांभाळतील. महिना अखेरीस ते या पदावर रुजू होणार आहेत.
गेल्या शुक्रवारी फिजी शुगर कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष विष्णू मोहन यांनी क्लार्क यांच्या गेल्या चार वर्षातील एफएससीमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल धन्यवाद दिले. एक परिपक्व नेतृत्व कार्पोरेशनला मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते.

नवनियुक्त सीईओ सिंह हे गेली अठरा वर्षे एफएससीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी दोन वर्ष डेप्युटी सीईओ आणि महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here