आपली कामे लवकर आटपून घ्या, उद्या बँक कर्मचारी जाणार संपावर

185

8 जानेवारीला होणार्‍या भारत बंतचा परिणाम बँकींग व्यवहारावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक खातेदारक आणि ग्राहकांना जर आपली बँकींग कामे तत्काळ करायची असतील त्यासाठी ती कामे 8 जानेवारीपूर्वीच आटोपल्यास होणारी गैरसोय टाळता येऊ शकते. केंद्र सरकारच्या आर्थिक रणनितींच्या विरोधात देशभरात 8 जानेवारीला भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.

ज्या बँकेचे कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी होतील त्या ठिकाणी बँकेच्या कामांना विलंब लागू शकतो. काही बँका बुधवारी बंद राहू शकतात. काही संघटनांनी म्हटले आहे की, बँक कर्मचारी आणि बँक अधिकारी बँकेची चावीच घेत नसल्यामुळे बँक कार्यालय उघडणेच कठीण होऊन बसेल. बँका बंद असतील तर 8 आणि 9 जानेवारी या दोन दिवसांमध्ये

एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. 9 जानेवारी नंतर बँका उघडतील मात्र, एटीएममधील पैशांचा तुटवडा कायम राहू शकतो. त्यामुळे पैशाशी संबंधीत कामांचा निपटारा लवकरात लवकर केल्यास संभाव्य अडचण टाळता येऊ शकते. दरम्यान, ऑनलाईन सेवा नियमितपणे सुरु राहणार असून, त्यात तांत्रिक अडचण वगळता कोणत्याही प्रकारे गैरसोय असणार नाही. या बंदला 10 केंद्रीय व्यापारी संघटना, डावे पक्ष आणि अनेक बँकाचे कर्मचार्‍यांचाही पाठिंबा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here