भारत पेट्रोलियम करणार डिझेलची होम डिलिव्हरी, या राज्यांमध्ये फ्युएलकार्टची सुविधा

नवी दिल्ली : खासगीकरणाच्या वाटेवर असलेल्या सरकारी तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियमने फ्युएल कार्ट या नावाने डिझेलची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. देशातील वाढत्या इंधनाच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली होती.

भारत पेट्रोलियमने पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी डिझेलची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. फ्युएलकार्ट या नावे सुरू केलेल्या या सुविधेचा फायदा पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, झारखंड आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मिळत आहे. कंपनीने या राज्यांमध्ये डिझेलची होम डिलिव्हरी करण्यासाठी ६३ मोबाईल डिस्टेंपर (चालते-फिरते पेट्रोल पंप) सुरू केले आहेत.

जे लोक डिझेलसाठी या मशिनरीचा वापर करू इच्छितात, अथवा ज्यांना हेवी व्हेईलकमध्ये डिझेल हवे आहेत, ते भारत पेट्रोलियमच्या फ्युएलकार्ट सुविधेचा वापर करून घरी डिलिव्हरी मिळवू शकतात. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार बीपीसीएलच्या रिटेल विभागाचे कार्यकारी संचालक पी. एस. रवी यांनी सांगितले की, फ्युएलकार्टकडून डिझेलची घरपोच सुविधा डिस्पेंन्सरच्या माध्यमातून केली जाईल. मोबाईल डिस्पेन्सर सुरक्षित पद्धतीने योग्य गुणवत्तेचे डिझेल घरी पोहोचवतील. डिझेल भरण्यासाठी यामध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्टिस्टीम आणि जिओ फेसिंग टेक्नॉलॉजी असेल.

भारत पेट्रोलियमची फ्युएल कार्ट थेट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या फ्यूएल डिस्पेन्सींगच्या व्यवसायाशी स्पर्धा करीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, ब्रिटनच्या बीरी आणि नायरा एनर्जीसोबत मिळवून रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड चालवते. त्यांच्याकडून घरपोच इंधन दिले जाते. याशिवाय रेस्पो एनर्जी, पेपफ्युएल, माय पेट्रोलपंप, फ्युएलबड्डी, हमसफर अशा स्टार्टअपमधून सरकारी आणि खासगी तेल कंपन्या इंधनाची होम डिलिव्हरी करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here