उत्तर प्रदेशमध्ये ऊस दरवाढीच्या मागणीला वेग

मुजफ्फरनगर : देशातील अनेक राज्यांमध्ये ऊस दरवाढीची मागणी केली जात आहे. आणि आता उत्तर प्रदेशमध्येही या मागणीला गती आली आहे.

भारतीय किसान युनियन (बिकेयू)च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस दरात वाढ आणि शेतकऱ्यांना सर्व थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी निदर्शने केली.

बिकेयूने उत्तर प्रदेश सरकारकडे ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल निश्चित करावा अशी मागणी केली आहे. मुजफ्फरनगर, शामली, बागपत, बिजनौर, सहारनपूर आदी ठिकाणी बिकेयूच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राकेश टिकैत यांनी सांगितले की, ऊस बिले १४ दिवसांत दिली जावीत असा नियम आहे. मात्र, आम्ही या नियमात सुधारणा करण्याची मागणी करीत आहोत. आता सरकारने ऊस बिले डिजिटल सिस्टिमद्वारे द्यावीत अशी मागणी आहे.

टिकैत यांनी मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान केले जात असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकारने शेताच्या भोवतीने तारांचे कुंपण लावण्यास मनाई केली आहे. ही मनाई हटविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here