भीमाशंकर साखर कारखान्याने दिले कोरोना प्रतिबंधक साहित्य

टाकळी हाजी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर साखर कारखान्याने पीपीई किट 200, हॅंन्डग्लोज 2000, मास्क 2000, सॅनिटायझर 5 लिटरप्रमाधे 100 नग याप्रमाणे असणारे करोना प्रतिबंधक साहित्य शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना दिले.

राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्‍यक असणारे हे कोरोना प्रतिबंधक साहित्य तहसीलदार शेख यांनी स्विकारले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here