दालमिया कामगार भवन नूतन इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया कारखान्याच्या कार्यस्थळावर दालमिया कामगार संघटनेच्या इंटक) कामगार भवन या नूतन इमारतीचा भूमिपूजन आणि खुदाईचा प्रारंभ कंपनीचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर कामगारांच्या हक्काची वास्तू असावी, अशी गेल्या कित्येक वर्षाची मागणी सत्यात उतरत असल्याचे मत कामगार नेते एम. एम. पाटील यांनी व्यक्त केले. कंपनीच्या सहकार्यामुळे कामगार भवन शक्य झाले असून कामगारांच्या फंडातून इमारत उभारल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी जनरल मॅनेजर के. श्रीधर गोसावी, असि. जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील, सुहास गुढाळे, एम. एम. पाटील, आर. के. पाटील, महादेव पाटील, मधुकर पोवार, जोतिराम शेळके, प्रकाश चौगुले, मोहन उत्रेकर, सचिन सांवत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here