बिद्री साखर कारखानाच्या इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्पचा भूमिपूजन समारंभ संपन्न

कोल्हापूर: ‘आपल्या देशात इथेनॉलची मागणी सातत्याने वाढत आहे. अशावेळी बिद्री साखर कारखान्याने डिस्टिलरी प्रकल्प उभारणीचा निर्णय अगदी योग्यवेळी घेतला आहे. येत्या वर्षभरात अत्यंत जलदगतीने या प्रकल्पाची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने कसोशीने प्रयत्न करु. हा नवा प्रकल्प कष्टकरी ऊस उत्पादक सभासदांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही’, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला. यासाठी बिद्री चा सुमारे १३८ कोटींचा हा डिस्टलरी प्रकल्प असून प्रतिदिन ६० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे.या प्रकल्पाचे विस्तारीकरण करून १ लाख १० हजार लिटर ने उत्पादन केले जाणार आहे . केंद्रशासनकडून यासाठी ६८ कोटी रुपये ६ टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहेत. यामुळे बिद्री काळानुसार बदलत असून यातून सभासदांना वेगळा लाभ मिळणार आहे.

बिद्री ( ता. कागल ) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याच्यावतीने कार्यस्थळावर उभारण्यात येणाऱ्या ६० हजार केएलपीडी प्रतिदिन क्षमतेचा आसवणी ( डिस्टिलरी ) प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याच्या संचालिका सौ. निताराणी सुर्यवंशी व माजी उपाध्यक्ष सुनीलराज सुर्यवंशी या उभयंतांच्या हस्ते या प्रकल्पाचे विधीवत भूमिपूजन पार पडले.

यावेळी बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, बदलत्या काळानुसार बिद्री कारखान्याने योग्यवेळी सातत्याने पुढचे पाऊल टाकत नवीन प्रकल्प राबवले. सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, गाळप विस्तारीकरण आदी उपक्रम यशस्वी करुन ऊस उत्पादक सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व  कामगार वर्गाच्या सहकार्यामुळे नविन डिस्टिलरी प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्याची आणि तो यशस्वी करुन दाखवण्याची जबाबदारी आम्ही सर्वजन पार पाडू.

याप्रसंगी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, मधूकर देसाई, एकनाथ पाटील, के. ना. पाटील, जगदीश पाटील, श्रीपती पाटील, युवराज वारके, अशोक कांबळे, सौ. निताराणी सुनिलराज सुर्यवंशी, सौ. अर्चना विकास पाटील, कामगार प्रतिनिधी शिवाजीराव केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, डिस्टिलरी इन्चार्ज एस. पी. शेंडगे यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here