देशभरातील विविध राज्यांत कोविड १९ ची वाढती प्रकरणे पाहता उत्तर प्रदेशामध्ये २५ डिसेंबरपासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत हा कर्फ्यू लागू असेल. यांदरम्यान, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन कोविड पोटोक्रॉल अनुसार २०० लोकांच्या उपस्थितीतच केले जावेत याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात ४९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर या दरम्यान १२ जण बरे झाले आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या २६६ आहे. तर १६ लाखाहून अधिक जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील ३७ जिल्ह्यांत एकही कोविड रुग्ण नाही. तर गेल्या २४ तासात १ लाख ९१ हजार ४२८ तपासण्यात झाल्या आहेत.
दरम्यान कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता मध्य प्रदेशातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची घोषणा केली आहे.