नवी दिल्ली : कोका-कोला कंपनीने म्हटले आहे की, भारतात आपल्या व्यवसाय सेवांचा विस्तार करताना कंपनीने उचललेल्या पावलांमुळे या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत चांगले रिझर्ल्ट मिळाले आहेत. कंपनीने ३१ मार्च रोजी समाप्त झालेल्या तिमाहीतील आकडेवारीची सोमवारी घोषणा केली. तिमाहीमध्ये निव्वळ विक्री एक वर्षाच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढून १०.५ बिलियन डॉलर झाली आहे. भारतात कोका-कोला कंपनीने किफारतशीर दरात आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्यासह अधिकाधिक आऊटलेट्सपर्यंत पोहोचून आपल्या ग्राहकांचा विस्तार केला आहे.
पहिल्या तिमाहीत या रणनितीने भारतात ५०० मिलियनहून अधिक वाढीच्या देवाण-घेवाणीसह चांगला निकाल हाती आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कामगीरी २० टक्क्यांनी चांगली आहे. या गतीशील देवाण-घेवाणीपैकी ७० टक्के छोटे पॅकेज जसे एकल सेवा, काचेच्या योग्य बॉटल्स आदींचा समावेश आहे. भारतात यावर्षी उन्हाळ्याचा कडक सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात ग्राहकांमध्ये गतीने वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने पेय विक्री वाढली आहे. कोका कोलाने तिमाही २४०००० आऊटलेट जोडले आहेत. भारतात ५०,००० कुलर बसविण्यात आले आहेत.
कोका कोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विंसी यांनी सांगितले की भारतात कंपनीने सर्व विभागांत ग्राहकांमध्ये वाढ आणि अनुरुप उत्पादनांच्या उत्पादनात वाढ करून चांगली कामगिरी केली आहे. विकसित बाजारासोबत उभरत्या बाजारपेठेतही उच्च स्तर गाठला आहे. विकसित बाजारात अमेरिका, युनायटेड किंगडम, मेक्सिको तर विकासशील तथा उभरत्या बाजारपेठेत ब्राझील, भारताचा समावेश आहे.