बिहार: १८ वर्षांनंतर सहरसामध्ये पुन्हा बहरली ऊस शेती

सहरसा : एकेकाळी ऊस उत्पादनाचे भांडार मानल्या जाणाऱ्या सहरसा विभागात १८ वर्षानंतर पुन्हा ऊस शेती फुलणार आहे. अठरा वर्षांपूर्वी या भागातील शेतकरी, ६० टक्के क्षेत्रात ऊस पिक घेत होते. या विभागाचे ते नकदी आणि मुख्य पिक होते.

न्यूज१८मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पूर्वी शेतकरी येथून थेट साखर कारखान्याला ऊस पाठवत होते. त्यासाठी येथे रेल्वेची एक छोटी लाईन होती. सोनबरसा कचेरीजवळ रेक पॉईंट होता. तेथेच राटन हे ऊस खरेदी केंद्र होते. दररोज २० डब्यांच्या मालगाडीतून ऊस वाहतूक केली जात होती. मात्र २००५ मध्ये मोठी रेल्वे लाईन टाकण्यात आली. त्यानंतर येथील राटन केंद्र बंद करण्यात आले. विभागाने येथून उसाचा वजन काटा हटवला. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी हळूहळू ऊस शेती बंद केली. आता अठरा वर्षानंतर पुन्हा यासाठी प्रयत्न झाले आहेत.

सहरसामधील भरौली, धकजरी, बलुआहा, बिशनपूर, दुधैला, अमरपूर ,भगवानपूर, हरिपूर, कवेला, रामपूर, सुहथ आदी ठिकाणी ऊस शेती केली जाते. एकेकाळी ऊसाचे हब मानल्या जाणाऱ्या या प्रदेशात पुन्हा ऊस शेतीला सुरुवात झाली आहे. मगध शुगर मिल हसनपूरचे कर्मचारी विविध गावात जावून उसाचे प्रगत बियाणे शेतकऱ्यांना देत आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल. याबाबत सोनबरसा कचेरीजवळील शेतकरी रामानंद सागर यांनी सांगितले की, ऊस शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसून येते. या कॅश क्रॉपमधून शेतकऱ्यांना एकाचवेळी पैसे मिळतात. हसनपूर साखर कारखाना यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या आम्ही सहा एकरमध्ये ऊस शेती पिकवली आहे. जवळपास १० गावांमध्ये २०० एकरात ऊस पिक घेण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी सागर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here