बिहार : उसासोबत आंतरपिके घेण्याच्या प्रशिक्षणासाठी शेतकरी बेगुसरायला रवाना

गोपालगंज : जिल्ह्यातील शेतकरी आता उसासोबत आंतरपीक लावण्याची पद्धतही शिकू लागले आहेत. उसाचे उत्पादन वाढावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने सिधवलिया साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत चौथ्या टप्प्यात मंगळवारी बरौली, सिधवलिया आणि बैकुंठपूर ब्लॉकमधील ४६ शेतकऱ्यांची तुकडी बेगुसरायला रवाना करण्यात आली.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक शशी केडिया आणि ऊस विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक राकेश सिंह यांनी या शेतकऱ्यांच्या गटाला हिरवा झेंडा दाखवून कारखान्याच्या आवारातून रवाना केले. सरव्यवस्थापक केडिया म्हणाले की, तीन विभागातील प्रगतीशील शेतकरी बेगुसराय आणि समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे निरीक्षण करतील.

हसनपूर साखर कारखान्याच्या परिसरात शेतकऱ्यांनी उसासह आंतरपीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी तेथील शेतकऱ्यांकडून आंतरपिकांची लागवड करण्याचे तंत्र शिकत आहेत. अधिक रिकव्हरी आणि जास्त उत्पादन देणाऱ्या उसाच्या वाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.

कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, यावर प्रशिक्षणाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले जात आहे. चौथ्या टप्प्यातील शेतकरी प्रशिक्षणानंतर परततील. ते स्वत: आपल्या शेतात उसासह हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि तेलबियांची लागवड करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here