बिहार: पाणी टंचाईमुळे ऊस पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

समस्तीपूर : हसनपूर परिसरात प्रचंड उन्हामुळे ऊस पिक वाळू लागले आहे. बोरिंगचा जलस्तर घसरू लागला आहे. त्यामुळे अनेक बोअरमधून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गुंठे ऊस पिकाला पाणी देण्यासाठीही कमीत कमी दहा तास लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विज पुरवठा झाला आहे, विजेचे कनेक्शन आहे, त्यांना सिंचन करण्यास फार प्रयत्न करावे लागत नाहीत. मात्र, जे शेतकरी पंपसेटवर शेती करतात, त्यांना उत्पादन खर्च काढणेही मुश्किल होईल अशी स्थिती आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी व भाजप नेते सुभाष चंद्र यादव यांनी सांगितले की, कधी अतिवृष्टीने शेतात पाणी साठून तर कधी दुष्काळामुळे शेतीची हानी होत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. चार दिवसांपासून कडक ऊन आहे. त्यामुळे सकाळी १० वाजल्यानंतर लोक घराबाहेर पडत नसल्याचे दिसते. अशा स्थितीतही शेतकरी पिकाच्या सिंचनासाठी धडपडत आहेत. शेतकरी अमन सिंह, अरविंद राय, शंभू राय, मकसूदन राय यांनी सांगितले की, कडक उन्हामुळे यंदा ऊसासह सर्व पिकांना फटका बसणार आहे. मान्सून येण्यास एक आठवड्याचा अवधी आहे. तेवढ्या कालावधीत पिक टिकवले नाही तर मोठे नुकसान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here