बिहार : सरकारच्या घोषणेअभावी जुन्या दरानेच सुरू आहे उसाची खरेदी

पाटणा : बिहारमध्ये उसाच्या दराची निश्चिती झाली नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला ऊस साखर कारखान्यांना जुन्या दरानेच विक्री करावा लागत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये ज्या दराने ऊस विक्री केला होता, त्याच दराने ते कारखान्यांना पुरवठा करीत आहेत. ऊस विभागाने यावर्षी आपल्या स्तरावर ऊस दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बिहार साखर कारखानदार असोसिएशनसोबत बैठक आयोजित करून ऊस दर ठरविण्यात येत होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांना उसाच्या नव्या दराचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यात चांगल्या प्रजातीचा ऊस ३३५ रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. तर सामान्य प्रजातीचा ऊस ३१० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री केला जातो. कारखानदारांकडून मध्यम प्रजातीचा ऊस २८२ रुपये प्रती क्विंटल दराने केला जात आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने उसाच्या दरात वाढ केली. मात्र, यंदा अद्याप या विषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. साखर कारखानदार असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बिहारसोबत उत्तर प्रदेशमध्येही अद्याप दर निश्चित झालेला नाही. मात्र, पंजाब सरकारने आपल्या राज्यासाठी ऊस दराची घोषणा केली आहे. २० रुपये प्रतिक्विंटल जादा दरवाढीसह कारखानदार उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करीत आहेत. यावर्षी राज्यातील ११ पैकी ९ कारखाने ऊस गाळप करीत आहेत, असे बिहार साखर कारखानदार असोसिएशनचे सचिव नरेश भट्ट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here