बिहार: केबीजे समुहाने केला इथेनॉल उद्योगात प्रवेश

101

पटना: केबीजे समुहा बिहारमध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. केबीजे समूह सध्या मनोरंजन, हॉस्पिटॅलिटी, सराफ उद्योग, कृषी उद्योग, ज्वेलरी अशा विविध उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे. केबीजे ग्रुपचे सीईओ मोहीत काम्बोज यांनी इथेनॉल उत्पादनातील शक्यतांबाबत चर्चेसाठी २ जुलै २०२१ रोजी बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांची भेट घेतली.

मुंबईतील केबीजे समूह, बिहार सरकारच्या सहकार्याने इथेनॉल उत्पादनात आपला उद्योग विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. मोहित काम्बोज यांनी हुसेन यांची भेट घेऊन उद्योगाच्या धोरणांबाबत चर्चा केली. बिहार सरकारने योजना चांगली तयार केली आहे. कच्च्या मालाची उपलब्धता त्वरीत होईल आणि परिसरातील रोजगार वृद्धीसाठी हा प्लांट शेतीच्या परिसरात सुरू केला जाईल असे काम्बोज यांनी सांगितले. पर्यावरणप्रेमी आणि मेक इन इंडिया अभियानाचे प्रवर्तक मोहित काम्बोज यांनी सांगितले की, ही योजना कृषी क्षेत्रासह रोजगार उद्योगाला प्रगतीच्या दिशेने नेईल. बिहार सरकार आपल्या विविध योजनांद्वारे राज्याच्या औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास, कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ उत्पादन, निर्यातीमध्ये सुधारणा तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे काम्बोज म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here