समस्तीपूर : हसनपूर साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न गतिमान केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बोअरिंगसाठी ७५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे, जेणेकरून उसाला सिंचन होऊन उत्पादन वाढू शकेल. कारखान्याच्या ऊस तोडणी विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष सुग्रीव पाठक यांनी सांगितले की, मे व जून महिन्यात उसाला पाणी देणे गरजेचे आहे. हा उसाच्या रोपांना अंकुर येण्याचा काळ आहे.
शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनाबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. त्यामुळे साखर कारखाना व्यवस्थापन गरजू शेतकऱ्यांना मदत करीत आहे. ते म्हणाले की, अलिकडच्या काळात पीकावर बोअरर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही कीड ऊस पिकासाठी हानिकारक आहे. किडीला सुरुवातीच्या टप्प्यात रोखण्यासाठी उसाच्या मुळांवर कोरायझनची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच एनपीकेची फवारणी करणे अत्यावश्यक आहे. कारखान्याच्यावतीने १६ हजार एकर क्षेत्रातील उसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.


















