पाटणा : कृषी विभागाने आपल्या जुन्या पद्धती बाजूला सारुन २८ पूरग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन आढावा घेण्यास सांगितले आहे. कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्देशानुसार नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावर्षी उभ्या ऊस पिकाचे जे नुकसान झाले आहे, त्याबाबतही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. भात व अन्य खरीप पिकांप्रमाणे या पिकांच्या नुकसानीबाबतही भरपाई केली जाईल. मुख्य ऊस उत्पादक जिल्हा पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य आणि सीतामढीत ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राज्यात मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. अनेक शेतांमध्ये पाणी साठले होते. या शेतांमध्ये भाताची लावण करता आली नव्हती. ज्या शेतांमध्ये यंदा शेतकऱ्यांना खरीपाचे पिक घेता आलेले नाही, अशा शेतकऱ्यांकडे गेल्या तीन वर्षात घेतलेल्या पिकाचे रेकॉर्ड असणे अनिवार्य असल्याची अट कृषी विभागाने घातली आहे. याशिवाय, मान्सूनची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर पुराने झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. पुराने भात, डाळीसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link