बिहार: मे, जून महिन्यात पाऊस नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण

हसनपूर : मे आणि जून महिन्यात पाऊस न पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. साधनांचा तुटवडा असतानाही सिंचन करण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी सोडलेले नाहीत. साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांच्यावतीने परिस्थितीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. यासोबत ऊस पिकाच्या नोंदणीचा आढावा घेतला जात आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हसनपूरच्या पटसा, नयानगर, मधेपूर, घोसदाहा, काले, वेधरा आदी भागातील पिकांची साखर कारखान्याच्यावतीने पाहणी करण्यात आली. साखर कारखान्याचे सहाय्यक ऊस उपाध्यक्ष सुग्रीव पाठक यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वाढविण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी मधेपूरमध्ये शेतकऱ्यांना ऊस पिक उन्हापासून वाचविण्याबाबत मार्गदर्शन केले. ३८ हजार एकरातील ऊस पिकाची पाहणी पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी ऊसाची नोंदणी करावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

ऊस उपाध्यक्ष डॉ. रामवीर सिंह यांनी सांगितले की, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. जे शेतकरी जून महिन्यापर्यंत आपला ऊस वाचवू शकतात, त्यांचे उत्पादन चांगले होईल. कडक ऊन्हाचा परिणाम ऊस पिकावर दिसून येत आहे. यापूर्वी दर महिन्यात उसाला पाच वेळा पाणी दिले जात होते. मात्र, दहा वेळा पाणी देवूनही पूर्वीसारखा ओलावा दिसत नसल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here