बिजनौर: साखर कारखान्याच्या पॉवर प्लान्टमध्ये एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट, दोघे जखमी

83

बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये स्योहारा ठाण्याच्या हद्दीतील अवध साखर कारखान्याच्या पॉवर प्लान्टमध्ये एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात दोन कामगार जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुरादाबाद येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.साखर कारखान्यातील पॉवर प्लान्टमध्ये दुपारी एसीत गॅस भरताना कॉम्प्रेसर फुटला. या स्फोटाचा आवाज दूर अंतरापर्यंत ऐकायला मिळाला. या अपघातात कंत्राटी कामगार अरमान आणि हयातनगर स्योहारा येथील कादिर हे गंभीर जखमी झाले. दोघांना

प्राथमिक उपचारानंतर मुरादाबाद येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
साखर कारखान्याच्या पॉवर प्लान्टमध्ये काम सुरू होते असे साखर कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष सुखवीर सिंह यांनी सांगितले. ठेकेदाराने नियुक्त केलेले कामगार एसीमध्ये गॅस भरण्याचे काम करीत होते. त्यावेळी अचानक कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुरादाबाद येथे पाठविण्यात आले आहे. कॉम्रेसरच्या कशामुळे फुटला याचा शोध घेतला जात आहे असे सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here