बिजनौर जिल्हा ऊस बिले देण्यात विभागात दुसऱ्या क्रमांकावर

बिजनौर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यामध्ये बिजनौरने मुरादाबाद विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८४ टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. ऊस उत्पादकांना १,०८० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चालू २०२३ हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे. या वेळी जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना चांगले पैसे देत आहत. बिजनौर बिल देण्यात विभागात द्वितीय क्रमांकावर आहे. तर संभल पहिल्या क्रमांकावर आहे. साखर कारखान्यांनी यावेळी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. इथेनॉलची विक्री चांगल्या दराने होत आहे. त्यामुळे कारखाने शेतकऱ्यांना चांगले पैसेही देत आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने वीज, इथेनॉल, कच्ची साखर, मोलॅसीस, साखर विक्रीतून शेतकऱ्यांना ऊस बिले देत आहेत. बुंदकी साखर कारखाना, बहादपूर कारखाना, बरकातपूर साखर कारखाना, स्योहारा साखर कारखाना आणि धामपूर साखर कारखाना शेतकऱ्यांना गतीने पैसे देत आहेत. फक्त बजाज ग्रुपच्या बिलाई साखर कारखान्याकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याची स्थिती आहे. आताही कारखान्याकडे शेतकऱ्यांचे १६ कोटी रुपये थकीत आहेत. जर कारखाना वेळेवर पेसै देवू शकले तर जिल्ह्यातील बिले देण्याच्या स्थितीत सुधारणा होवू शकते. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ८४ टक्के बिले दिली आहेत. शेतकऱ्यांना १०८० कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती बिजनौरचे जिल्हा ऊस अधिकारी प्रभू नारायण सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here