बिजनोर: किसान पंचायतीमध्ये विज, ऊसाचा मुद्दा उपस्थित

बिजनौर : भारतीय किसान युनियनच्या पंचायतीमध्ये विज, उसासह शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांवर चर्चा झाली. यासोबत त्यांच्या सोडवणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात आली. संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यानंतर भाकियू जिल्हाध्यक्ष सत्यवीर सिंह यांनी सांगितले की, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेवून या समस्यांची सोडवणूक केली जाणार आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस समितीच्या मैदानात आयोजित मासिक पंचायतीमध्ये चौधरी सत्यवीर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याची सोडवणूक करण्याची गरज आहे. प्रत्येक कारखाना शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप केल्यानंतरच बंद होईल. पिकांच्या सिंचनासाठी कालव्यांमध्ये लवकर पाणी सोडण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कुपनलिकांसाठी कोणत्याही अटींशिवाय वीज पुरवठा केला पाहिजे. मंडल अध्यक्ष बाबूराम तोमर यांनी शेतकऱ्यांचे इतर प्रश्न उपस्थित केले. यावेळी ठाकूर राम अवतार सिंह, होशियार सिंह, अजय बालियान, लक्ष्मीकांत शर्मा, डॉ. विजय सिंह, दिनेश सिंह, नरदेव सिंह, संदीप त्यागी, अमित उर्फ काले, राजेंद्र सिंह, रमेश शेखावत, कविता सिंह, महिपाल सिंह, डालचंद प्रधान, पंकज शेरावत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here