ऊस उत्पादनात बिजनौरचे सुभाषचंद्र यांना राज्यात प्रथम पुरस्कार

बिजनौर : शेतकरी सुभाषचंद्र यांनी उसाचे बंपर उत्पादन घेऊन जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. शेतकरी सुभाषचंद्र यांनी एक हेक्टरमध्ये २६३४ क्विंटल उसाचे उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना ५० हजार रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

मोहम्मदपूर देवलम विभागातील अलीपूर नंगला गावातील शेतकरी सुभाषचंद्र यांनी २०२०-२१ मध्ये ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. सुभाषचंद्र यांनी एक हेक्टर क्षेत्रात २६३४ क्विंटल ऊसाचे उत्पादन घेतले. गेल्या गळीत हंगामात त्यांच्या उसाची तोडणी करण्यात आली होती. शेतकरी सुभाषचंद्र यांनी स्ट्रेंच विधीने ऊसाचे उत्पादन घेतले. ०२३८ प्रजातीच्या उसाची लागवड करण्यात आली होती. जैविक आणि ऑर्गनिक स्प्रे करुन उसाचे उत्पादन घेतले आहे.

उसासोबत त्यांनी उडीद पिक घेतले होते. पूरक पिके घेतल्याने शेतातील नायट्रोजनची कमतरताही भरुन काढली जाते असे सुभाषचंद्र यांनी सांगितले. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, सुभाषचंद्र यांनी सर्वोत्तम पिक उत्पादन घेऊन जिल्हाचे नाव सर्वत्र झळकवले आहे. पूरक पिक घेऊन नफा कमवला आहे. पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here