दौराला साखर कारखान्याकडून २५.७९ कोटींची बिले अदा

106

मेरठ: दौराला साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना २७ जानेवारी अखेरपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे पैसे देण्यात आले आहेत.

कारखान्याचे महा व्यवस्थापक संजीव कुमार खाटीयान यांनी सांगितले की, सध्याच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून २१ ते २७ जानेवारी या कालावधीत घेतलेल्या ऊसापोटी २५.७९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आतापर्यंत साखर कारखान्याने १३८.३१ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. तर गेल्या वर्षी याच काळात कारखान्याने १३१.२५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. शेतकऱ्यांनी स्वच्छ ऊस पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले. सहकारी ऊस विकास समितीचे सचिव प्रदीप कुमार यांनी सांगितले की लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here