उद्योगांना गती देण्यासाठी सरकार उचलणार मोठी पावले

गुवाहाटी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी सांगितले की केंद्र सरकार येत्या काही दिवसांत उद्योगांना गती देण्यासाठी दोन मोठी पावले उचलणार आहे. सरकारने खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला असून ऑटोमोबाईल मार्केटमधील सुस्तपणा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भविष्यात ३० दिवसांच्या आत जीएसटी परतावा द्यावा, तसेच पुढील ६o दिवसांच्या आत सर्व प्रलंबित जीएसटी परतावा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. पण सरकार जाहीर करणार असलेल्या दोन महत्वाच्या घोषणांबाबत मात्र त्यांनी मौन पाळले.

त्या म्हणाल्या, जागतिक पातळीवर जर आपण अर्थव्यवस्था आणि विकासाची तुलना केली तर आपली अर्थव्यवस्था अजूनही वेगाने वाढते आहे. अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी सरकारने सार्वजनिक खर्चात “पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयकडून मिळालेल्या 1.76 लाख कोटी रुपयांच्या शासकीय योजनेचा उपयोग करण्याबाबत, अद्याप काहीही निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था चालविण्यासाठी “प्रचंड भ्रष्टाचार आणि घोटाळे” केल्याबद्दल सीतारमण यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाना साधला आणि म्हणाल्या, त्यांच्या कार्यकाळात चलनवाढीने उच्चांक गाठला.

“असक्षम अर्थव्यवस्था” चालविण्याबाबतच्या कॉंग्रेसच्या टिप्पणीला उत्तर देताना त्या म्हणाल्या, विरोधी पक्षाने अर्थव्यवस्था “तंदुरुस्त किंवा अयोग्य” असल्याबद्दल भाष्य करू नये. भ्रष्टाचारी काँग्रेसने देशाचे नेतृत्व केले आणि सार्वजनिक मालमत्तेचे शोषण केले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here