मेनका गांधीं यांनी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना दिली कडक चेतावणी

सुल्तानपूर, (उत्तर प्रदेश) : ऊस शेतकर्‍यांद्वारा सुल्तानपुर साखर कारखाना सतत बंद असण्याच्या तक्रारीनंतर मेनका गांधी यांनी कारखान्याचा दौरा केला. या दरम्यान, त्यांनी सांगितले की, कॅबिनेट ने कारखान्याच्या सुधारणेसाठी मंजूरी दिली आहे.

गांधी यांनी आपल्या चार दिवसीय दौर्‍याच्या शेवटच्या रविवारी शहरापासून पाच किलोमीटर दूर असणार्‍या सुल्तानपूर साखर कारखान्याचे निरिक्षण केले. कारखान्याच्या परिसरात दाखल झाल्या झाल्या तिथे उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांना घेराव घातला आणि आपल्या समस्यांबाबत चर्चा केली. सतत साखर कारखाना बंद होत असल्यामुळे त्यांनी अधिक़ार्‍यांना चेतावणी दिली आणि सांगितले की, जोपर्यंत शेतकर्‍यांच्या शेतात ऊस आहे, तोपर्यंत साखर कारखाना बंद होता कामा नये. कारखाना प्रबंधक रामजी सिंह यांनी दिलासा दिला की, कोणत्याही परिस्थितीत साखर कारखाना बंद होणार नाही, ना ही शेतकर्‍यांना ऊस परत केला जाणार. याबरोबरच या कारखान्याच्या सुधारणेसाठी ऊस विकास प्रमुख सचिव संजय भुसरेड्डी यांच्याशी गांधी यांनी मोबाइलवरही चर्चा केली.

गांधी यांनी सांगितले की, पाच साखर कारखाने वाईट अवस्थेत आहेत, ज्यामध्ये सुल्तानपूर साखर कारखानाही सामिल आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. कैबिनेट ने कारखान्याच्या सुधारणेसाठी मंजूरी दिली आहे. लवकरच साखर कारखाना फेडरेशन ला डीपीआर पाठवण्यात येईल, यानंतर विस्तारीकरण व इतर काम सुरु होतील. यानंतर मेनका यांनी विविध कार्यक्रमात भाग घेतला, शिवाय दिल्लीसाठी रवाना झाल्या. त्या 15 जानेवारीला दोन दिवसांसाठी पुन्हा या क्षेत्राच्या दौर्‍यावर येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here