भाजप-आरएलडी मैत्री : युपी सरकार उसाला अतिरिक्त १० रुपये बोनस देण्याची शक्यता

लखनौ : लोकसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एसएपी व्यतिरिक्त बोनस म्हणून अतिरिक्त १० रुपये देण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रीय लोकदलाची भाजपसोबत मैत्री वाढल्याने उसाची गोडी वाढण्याची आशा निर्माण होऊ लागली आहे. एनडीएमध्ये आरएलडी सामील झाल्यानंतर सरकार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते.

‘हिंदुस्थान’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरएलडीने उसाचा दर वाढवून ४०० रुपये करण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार उसाच्या एसएपी व्यतिरिक्त १० रुपये बोनस देऊ शकते. एनडीएसोबतच्या युतीमध्ये उसाचा दर वाढवण्याचे संकेत आरएलडीच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आरएलडीने उसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली होती. आताच्या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना बोनस देऊ शकते. आरएलडी हा एनडीएचा घटक बनणार आहे. चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर आरएलडी एनडीएमध्ये सामील होण्याची औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here