भाजपचे १३ रुपये किलो साखरचे आश्वासन

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवी दिल्ली : चीनी मंडी

भारतीय जनता पक्षाने नुकताच आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने गरिबांना अन्न सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत १३ रुपये किलो दराने साखर देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांना २०२२ पर्यंत पक्क्या घरांचे आश्वासनही देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची टक्केवारी येत्या पाच वर्षांत दहा टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

सबका साथ सबका विकास या धेय्याअंतर्गत भविष्यात १३ रुपये किलोने देण्यात येणाऱ्या अनुदानीत साखरेची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, भविष्यात ८० कोटी कुटुंबांना १३ रुपये किलो दराने साखर देण्यात येईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. देशात सध्या साखरेचा अतिरिक्त साठा आहे. दर खाली घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला फारशी मागणी नाही. एकूणच साखर उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजपने कोणत्या धर्तीवर १३ रुपये किलोने साखर देण्याचे आश्वासन दिले आहे, असा प्रश्न साखर उद्योगापुढे पडला आहे.

मावळत्या सरकारच्या जन धन योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाल्याचे सांगून भाजपने जाहीरनाम्यात स्वतःचीच पाठ थोपटली आहे. डेटाची गोपनियनता आणि सुरक्षितता ध्यानात ठेवून भविष्यात नवीन डेटा शेअररिंग पद्धती अमलात आणण्याची योजना सरकारने आखली आहे. यामुळे जन धन आणि आधार योजनेच्या यशस्वीतेला बळ मिळेल, असे भाजपने म्हटले आहे. देशात आर्थिक साक्षरतेसाठी विशेष मोहिम राबविण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here