14 सप्टेंबरला साखर कारखान्याला घेराव घालणार भाकियू

103

गढमुक्तेश्‍वर: शेतकर्‍यांच्या समस्येबाबत भारतीय किसान यूनियन च्या भानू गटाकडून 14 सप्टेंबरला सिंभावली साखर काखान्याला घेराव घालण्यात येणार आहे. हे आंदोलन यशस्वी बनवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गावात जावून अधिकाधिक शेतकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी भाकियू (भानू) यांची बैठक सिंभावली क्षेत्रातील बिरसिंहपूर गावात आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये 14 सप्टेंबरला शेतकर्‍यांना ऊस थकबाकी, खते यांच्यासह इतरही अनेक समस्यांबाबत साखर कारखान्यावर होणार्‍या धरणे आंदोलनाची रुपरेखा तयार करण्यात आली.

बैठकीमध्ये हे निश्‍चित करण्यात आले की, ट्रॅक्टर ट्रॉली मधून हजारो शेतकरी धरणे आंदोलनस्थळी पोचतील. प्रदेश महासचिव सरनजीत गुर्जर यांनी सांगितले की, धरणेस्थळी खाण्याची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मागणी पूर्ण न झाल्यास दिवसरात्र धरणे प्रदर्शन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. बैठकीमध्ये परिसरातील सलारपूर, माधापुर, धनपुरा, खड्या, हिम्मतपूर, डिबाई, शरीकपूर, मतनौरा, मुक्तेश्वर या गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष पवन हूण, डॉ.ओमकार सिंह, जेई सिंह, रुपराम, कृष्णवीर सिंह, गब्बर, खालिद लोकेश सैन, रुपेश, विजय शर्मा, भूले, रामबीर, सुरेश आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here