थकीत ऊस बिलांबाबत भाकियू- कारखान्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा

बिजनौर : हल्दौर विभागीय कार्यालयात भाकियूने आयोजित बैठकीत बिलाई साकर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांची सर्व थकीत ऊस बिले देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तेथे आलेल्या साखर कारखान्याचे अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी ऊस बिलांबाबत चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच बिले अदा करण्यात येतील असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार हल्दोर विभागीय कार्यालयात भाकियूच्या बैठकीत विभाग अध्यक्ष धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांना इतर पिके घेताना अडचणी आल्या आहेत. यावेळी तेथे विकास खंड अधिकारी विरेंद्र कुमार यादव, सहकारी ऊस विकास समितीचे सचिव ओमप्रकाश सिंह, बिलाई साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस अधिकारी सिताब सिंह पोहोचले. शेतकऱ्यांशी त्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली. लवकारत लवकर पैसे दिले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी लवकर पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बैठकीस धर्मेंद्र राणा, महेंद्र पाल सिंह, जसराम सिंह, शुभम कुमार, रामा, इक्बाल मलिक, जसवंत सिंह, सुरेंद्रपाल सिंह, नरेश कुमार, धर्मवीर सिंह, जयपाल सिंह रामपाल सिंह, धनवीर सिंह, राजेंद्र सिंह, टीकम सिंह, डालचंद प्रधान, अरुण कुमार आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here