ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाकियू टिकैत गटाचे आंदोलन

संभल : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत भारतीय किसान युनियनच्या टिकैत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रजपुरा ऊस समितीसमोर निदर्शने केली. ऊस समितीच्या सचिवांना निवेदन देवून या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शुक्रवारी भाकियू टिकैत गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रजपुरा ऊस समितीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडत निदर्शने केली. समितीच्या सचिवांच्या नावे असलेले निवेदन त्यांच्या अनुपस्थितीत अकाउंटंट निलम यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणीविषयक समस्यांमुळे अनेक ठिकाणी भटकावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. शेतकऱ्यांऐवजी दलालांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू यादव यांनी केला. जर तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभारले जाईल. समितीचे सचिव देशराज सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या निवेदनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. यावेळी चंद्रकेश यादव, यादवेंद्र सिंह, नीरज यादव, कोमल सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here