सहारनपूर : भाकियू टिकैतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे सहा कलमी निवेदन शुक्रवारी उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने गंगनौली साखर कारखान्याकडील उसाची थकीत बिले लवकर देण्याची मागणी करण्यात आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे जिल्हाध्यक्ष चौधरी राजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी अंकुर वर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बसेरा गाव ते मीरपूर या गावापर्यंत रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा मार्ग तयार करावा. याशिवाय मिरपूर रेल्वे फाटकावर बांधण्यात येत असलेला पूल व भुयारी मार्ग ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात, पॉवर कॉर्पोरेशनच्या तपासणीतील मनमानी रोखण्याची मागणी करण्यात आली. हलगोवा गाव ते उत्तराखंड सीमेपर्यंत बांधण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गामध्ये रस्ता क्रॉसिंग आणि भुयारी मार्ग रस्त्याच्या पातळीपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी विभागीय सचिव चौधरी वीरेंद्र सिंह व प्रदेश उपाध्यक्ष विनय कुमार, इतर शेतकरी उपस्थित होते.