ऊसाची किंमत वाढवण्याच्या मागणीसाठी भारतीय शेतकरी यूनियनचे जानेवारीत आंदोलन

पानीपत (हरियाणा) : राज्यात ऊसाच्या किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी भारतीय शेतकरी युनियनच्या वतीने जानेवारीच्या पहिल्या आठवडयात एक मोठे आंदोलन करण्यात येणार आहे, ज्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

शेतकरी युनियनचे प्रदेश अध्यक्ष चौधरी रानमान म्हणाले, हरियाणा सरकार शेतकऱ्यांची कोणतीच खबर घेत नाही, शिवाय गेल्या दोन वर्षात ऊसाची किंमतही वाढवलेली नाही, यामुळे राज्यातील ऊस शेतकरी अडचणीत आहेत. राज्यभरात शेतकऱ्यांकडून उग्र विरोध होऊनही सरकारने काहीच केलेले नाही. सरकारच्या या भूमिके विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, ई-ट्रेडिग प्रणाली आणि ऊसाच्या मुद्यावरून ११ सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. ऑनलाईन प्रणालीला कठोर विरोध केला जाणार आहे.

यूनियन चे जिलाध्यक्ष सुभाष गुर्जर यांनी सांगितले की, यूनियनची मासिक बैठक पानीपत येथील कार्यालयात प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यामध्ये इतर मुद्यांशिवाय ऊस दराबाबत मोठे आंदोलन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत मागणी केली की, शेतकऱ्यांच्या ट्यूबवेल बिलांची व्याज माफी योजनेची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात यावी. ते म्हणाले, जानेवारीपासून ऊस दराबाबत प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांची सभा आयोजित केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here