ऊस थकबाकी लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा भाकियूचा इशारा

गढमुक्तेश्‍वर, उत्तर प्रदेश: लोकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्याने संतापलेल्या भाकियू कार्यकर्त्यांनी ऊस थकबाकी न भागवल्याने नाराजी व्यक्त केली आहे. एसडीएम यांना निवेदन देवून जनहिताकडे दुर्लक्ष केल्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

भाकियू भानु गटाचे कार्यकर्ते गुरुवारी तहसील मुख्यालयावर एकत्र आले. त्यांनी प्रदेश महासचिव सरनजीत गुर्जर आणि प्रदेश उपाध्यक्ष कृष्णवीर गब्बर यांच्या नेतृत्वामध्ये एसडीएम यांना निवेदन देवून जनहिताशी संबंधीत समस्यांचे निराकरण न झाल्याने मोठी नाराजी व्यक्त केली आहे. सरनजीत गुर्जर यांनी सांगितले की, गढ मेरठ रोड वर जागोजागी असणारे खड्डे दुर्घटनेचे मुख्य कारण आहेत, ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा जिव गेला आहे, त्याबरोबरच आतापर्यंत महिला मुलांसह डझनभर लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्रदेश उपाध्यक्ष कृष्णवीर गब्बर यांनी सांगितले की, ऊस थकबाकी न भागवल्याने आर्थिक संकटात असणारे शेतकरी गरजेसाठी बँकांसह सावकारांकडून व्याजावर कर्ज घेत आहेत. पण सींभावली साखर कारखान्याला घेराव घालण्याच्या दरम्यान जिल्हा आणि तहसील प्रशासनातील अधिकार्‍यांनी 15 दिवसांमध्ये ऊस थकबाकी भागवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते दोन महिन्यानंतरही पूर्ण झालेले नाही. एसडीएम विजय वर्धन तोमर यांनी विश्‍वास व्यक्त केला की, जनहिताशी संबंधीत समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याबरोबर शेतकर्‍यांना ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवली जाईल. यावेळी कुंवरपाल चौहान, मनोज प्रधान, आदेश गुर्जर, रामवीर सिंह, भूलेराम, गोपाल सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here