थकीत ऊस बिलप्रश्नी भाकियू करणार आंदोलन

अमरोहा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाकियू शंकरच्यावतीने आयोजित बैठकीत थकीत ऊस बिलांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. धनौरातील वेव्ह साखर कारखान्याकडून थकीत बिल वसुली करावा आणि बंद पडलेला अमरोहा साखर कारखाना पुन्हा सुर करावा अशी मागणी करण्यात आली. अमरोहा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार , काफूरपूर पॉवर हाऊस येथे भकीयू शंकर गटाची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी दिवाकर सिंह म्हणाले की, साखर कारखाने बंद होऊन जवळपास ४ महिने उलटून गेले आहेत. तरीही धनौरातील वेव्ह साखर कारखान्याने आजपर्यंत उसाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. थकीत बिले लवकर न दिल्यास या साखर कारखान्याऐवजी पुढील गळीत हंगामात दुसऱ्या साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला जाईल. जिल्हाध्यक्ष सत्पाल सिंह म्हणाले की, घरगुती वीज ग्राहकांच्या नवीन बिल प्रणालीमुळे मोठे नुकसान होत आहे. आगामी गळीत हंगामासाठी उसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर मिळावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नेपाल सिंह, विजय पाल सिंह, जयंत सिंह, ओमपाल दरोगा, जितेंद्र सिंह, शिवराज सिंह, सरदार सिंह, सुरजीत, चरण सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here