रिअल इस्टेट ग्रुपकडे सापडले तीन हजार कोटी रुपयांचे काळे धन

दिल्ली: नोएडा एनसीआरमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका मोठ्या रिअल इस्टेट ग्रुपकडे तीन हजार कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचे उघडकीस आले आहे. सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने नुकतीच याबाबतची माहिती दिली. आयकर विभागाच्या छाप्यावेळी ही बाब समोर आली असून सीबीडीटीने संबंधित रिअल इस्टेट ग्रुपचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

मागील आठवड्यात २५ ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी येथील एका रिअल इस्टेट ग्रुपकडे २५० कोटी रुपये एवढी रोख रक्कम सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडील ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपने अनेक प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्सही भरलेला नाही. जवळपास ३.७५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ताही जप्त केली आहे. ग्रुपने ३ हजार कोटींचा काळा पैसा असल्याचे मान्य केले आहे. तसेच त्यावर टॅक्स देण्याची तयारी दर्शवली आहे. छाप्यानंतर संबंधित ग्रुपची ३२ बँक लॉकर सील करण्यात आली आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या ग्रुपकडे रोख रकमेची जी नोंद होती त्यात २५० कोटी इतका काळा पैसा असल्याचे स्पष्ट झाले. ही संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली. या ग्रुपने अनेक मालमत्तांच्या व्यवहारांवरील करही अदा केलेला नाही. सुमारे ३.७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपने ३ हजार कोटी रुपये इतके काळे धन असल्याची कबुली चौकशीत दिली आहे. छापेमारीच्या कारवाईनंतर संबंधित ग्रुपचे विविध बँकांतील ३२ लॉकरही सील करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here