साखर कारखान्यात मोठा स्फोट, एक ठार, 5 जखमी

परभणी : परभणी तालुक्यातल्या अमडापूर येथे असणार्‍या लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्यात टर्बाईन मशिनचा मोठा स्फोट झाला. याप्रसंगी कारखान्यात काम करणार्‍या एका कामगाराचा मृत्यू झाला असून, 5 कामगार जखमी झाले आहे. या दुर्घटनेवेळी हे कामगार मशीनच्या सर्व्हिसिंगचं काम करत होते. टर्बाईन ओव्हर ऑयलिंग करताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेतील जखमींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या स्फोटात युसूफ अली साहेब अली शेख (65) या कामगाराने आपला जीव गमावला आहे. जखमींमध्ये बाळासाहेब गोविंदराव दंडवते (45), सुभाष पेंडगे (50), नरहरी शेजुळ (35), ज्ञानेश्‍वर कन्हाळे (30), आणि शेशराव वाघ (40) यांचा समावेश आहे. रविवारी घडलेल्या या  घटनेमुळेे अमडापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. अद्यापही स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्याचे पो.नि. पाडाळकर अधिक तपास करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here