सहकार शिरोमणी कारखान्याच्यावतीने रक्तदान शिबिर

सोलापूर : चंद्रभागानगर येथील सहकार शिरोमणी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित शिबिरात ८० जणांनी रक्तदान केले. सहकार शिरोमणी स्व. वसंतराव काळे यांच्या ८० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हा नियोजन मंडळचे सदस्य सुरेश पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चेअरमन कल्याणराव काळे होते.

शिबिरात परिसरातील नागरीक, कामगार, पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वांना पाण्याचे जार देऊन चेअरमन काळे यांनी सन्मानीत केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यातून अनेकांना जीवदान मिळू शकते, असे प्रतिपादन काळे यांनी यावेळी केले. शिबीरामध्ये पंढरपूर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संतोष उपाध्ये, शुभम घोंगे, गणेश सलगर, साक्षी सोनवणे, रजिया नदाफ आदींनी रक्तसंकलन केले. व्हा. चेअरमन भारत कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे, ‘विठ्ठल’चे माजी संचालक दशरथ खळगे आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here