शिंदे शुगर अँड अलाइड कारखान्यावर ४११ जणांचे रक्तदान

सोलापूर : तुर्क – पिंपरी (ता. बार्शी) येथे जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा बबनराव शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रिजचे संस्थापक-चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन सुहास पाटील व नीळकंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ४११ जणांनी रक्तदान केले. दरम्यान, रणजितसिंह शिंदे यांना आमदार करण्यासाठी ज्येष्ठ नेते व युवा कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील यांनी केले आहे.

सुहास पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीत रणजितसिंह शिंदे हेच आमदार व्हावेत यासाठी आम्ही आ. बबनराव शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहोत. आजपर्यंत आम्ही शिंदे कुटुंबीयांच्या आज्ञेनुसारच राजकारण केले आहे. हनुमंत पाडुळे, उल्हास राऊत, संदीप पाटील, कैलास मते, शहाजी गिराम, अरविंद चौधरी, शहाजी हांडे, अमरसिंह पाटील, राहुल पाटील, शंकर तहसीलदार, रवींद्र चव्हाण, राजेंद्र खोत आदी उपस्थित होते. दरम्यान, राजेंद्र गुंड यांनी प्रास्ताविक केले. शहाजी हांडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here