‘गोडसाखर’ चा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ

गडहिंग्लज : हरली (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ गळीत हंगामाचा ४४ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक काशीनाथ कांबळे व प्रमिला कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक अॅड. दिग्विजय कुराडे व पौर्णिमा कराडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर होते. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले.

यावेळी अध्यक्ष डॉ. शहरापूरकर म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बील देण्याचा रप्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२३-२४ गत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सतीश पाटील, प्रकाश पलाडे, बाळासाहेब मंचेकर, प्रकाश पाटील आदीसह अधिकारी, कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here