मांजरा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पूजन करण्यात आले.

गळीत हंगाम यशस्वी करुन कारखान्याची परंपरा कायम ठेवु, असे माजी मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. समारंभाला लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here