साखर कारखान्यात बॉयलर पाइप फुटून अपघात, चार मजूर जखमी

बटाला : बटाला शुगर मिलमध्ये बॉयलर मशीन उघडताना झालेल्या अपघातात बॉयलरचा पाईप फुटल्याने गरम पाणी अंगावर पडून चार मजूर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत बटाला शुगर मिलचे वर्कशॉप फोरमन जसविंदर सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी पाच वाजता मजूर बॉयलर मशीन घडत होते. अचानक मशीनचा नट तुटला. त्यामुळे पाईप फुटून त्यातील गरम पाणी मशीनची दुरुस्ती करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जखमी मजुरांना ताततडीने बटाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे सरव्यवस्थापक व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

शुगर मिलचे चेअरमन सुखविंदर सिंह काहलो यांनी सांगितले की पाईप फुटल्याने चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी जे जबाबदार असतील, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. जखमी झालेल्यांमध्ये मॅन्युअल मसीह (रा. शक्करी), सुखजित सिंह (कंड्याल), सदीक मसीह (बहादपूर), ताजर मसीह (उदोवाल) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here