साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांच्या हस्ते बॉयलर पूजन

धामपूर, उत्तर प्रदेश: धामपुर साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी पूजन करुन 170 टनाच्या बॉयलर मध्ये अग्नि प्रज्वलन केले. कारखान्याचा गाळप हंगाम 26 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. यावेळी धामपूर साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शर्मा, उपाध्यक्ष एमआर खान यांनी सांगितले की, लवकरच साखर कारखान्यातील मशीन्स तयार करुन गाळप हंगाम सुरु करावा. त्यांनी सांगितले की, धामपुर साखर कारखान्याकडून आपल्या बाह्य खरेदी केंद्रांवर वजन काटे लावले जात आहेत.

साखर कारखान्यामध्ये जोरात तयारी सुरु आहे. प्लांट, मशिनरी तसेच उपकरणे यांची ट्रायल सुरु केली जात आहे. कारखान्याची ट्रायल संपल्यावर ऊस खरेदीसाठी इंडेंट जारी केला जाईल. जेणेकरुन शेतकरी ऊस पुरवठा करण्यासाठी ऊसतोड सुरु करु शकतील. यावेळी आजाद सिंह, मनोज उपरेती, संजय सिंह, राजीव, पंकज जैन, विनीत कुमार, मनोज चौहान, विकास अग्रवाल, अनिल शर्मा, कुलदीप शर्मा, सुधीर सिन्हा, विजय गुप्ता, सुदर्शन कुमार, सोमेंद्र, विजय मोहन मिश्रा, उज्ज्वल सिंह रावत, समरपाल आदी उपस्थित होते. पूजनामध्ये बॉयलर चे कर्मचारी रामपाल सिंह, चंद्रशेखर, शमीम, अंकित त्यागी, विकास कुमार, चंद्रजीत शर्मा, उत्तम सिंह, चंद्रशेखर, अंकित, हरीशंकर, ब्रह्म कुमार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here