बॉलीवूड अ‍ॅक्टर इरफान खानचे न्यूरोक्राइन ट्यूमरमुळे 54 व्या वर्षी निधन

गेल्या कित्येक दिवसांपासून न्यूरोक्राइन ट्यूमर शी झगडत असणारे बॉलीवूड अ‍ॅक्टर इरफान खान यांचे आज निधन झाले. त्यांची तब्येत अचानकपणे बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटलमध्ये आईसीयू मध्ये ठेवण्यात आले होते.

इरफान यांचे अधिकृत प्रवक्ता यांनी अशी माहिती दिली होती की, इरफान यांची तब्येत स्थिर आहे. आणि त्यांना कोलोन इन्फेक्शन मुळे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी त्यांचे निधन झाले.

‘मला विश्‍वास आहे की, मी आत्मसमर्पण केले आहे.‘ असे इरफान खान कायम म्हणायचे. 2018 मध्ये कॅन्सरशी झगडत असताना देखील ही बाब त्यांनी सांगितली होती. इरफान खान खूपच मीतभाषी होते आणि बोलण्यासाठी डोळ्यांचा अधिक वापर करत होते.

इरफान खान आपल्या आजाराबरोबरच अत्यंत भावनिक फेजमधून जात होते. 25 एप्रिल ला इरफान खान यांच्या आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउनमुळे त्यांना आपल्या आईचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आपल्या आईला शेवटचा निरोप दिला होता.

इरफान यांनी एका ट्वीट मध्ये लिहिले होते की, मला माहित आहे की मला एंडोक्राइन ट्यूमर आहे. यातून जाणे खूपच अवघड आहे. यासाठी मला देशाबाहेर जावे लागणार. मी सर्वांना अशी विनंती करेन की, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आशिर्वाद द्या. ज्याप्रकारच्या अफवा माझ्याबद्दल उठवल्या गेल्या होत्या त्याबद्दल मला सांगायचे आहे की, न्यूरो चा अर्थ केवळ डोक्याची असत नाही, वाटल्यास आपण सर्वांनी गूगल वरुन याबाबत रिसर्च करु शकता.

चित्रपट क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी इरफान खान यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. इरफान खान यांना 2011 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय 2012 मध्ये त्यांना फिल्म पानसिंह तोमर साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्यासाठी असणार्‍या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2004 मध्ये बेस्ट अ‍ॅक्टर फॉल निगेटीव रोलसाठी फिल्मफेअर अ‍ॅर्वार्ड देण्यात आले होते. याशिवाय 2008 मध्ये बेस्ट अ‍ॅक्टर इन सपोर्टिंग रोल चा फिल्म फेअर चा पुरस्कार मिळाला होता.
इरफान खान यांचे शेवटचे ट्वीट

या महिन्याच्या 12 एप्रिल ला इरफान यांनी शेवटचे ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘‘मिस्टर चंपकचे स्टेट ऑफ माईंड यावेळी, आतून प्रेम, ज्याला ते बाहेर दाखवायचे आहे.‘‘ इरफान खान यांनी हे ट्वीट आपल्या शेवटच्या फिल्म च्या ऑनलाइन रिलीज च्या वेळी केले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here