साखर धंद्याचा पाय दिवसेंदिवस खोलातच चालला आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर कोसळत आहेत, साखर निर्यात जवळजवळ थांबली आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरगोदामे ओसंडून वाहात आहेत. या हंगामाची धुराडी विझतात तोच नव्या ऊसतोडीची तयारी सुरू झाली आहे. त्याला सामोरे जाताना यंदा प्रथमच साखर धंद्यात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कारखान्यांवरील ‘एफआरपी’चे ओझे वाढले असून ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची कशी, असा मुख्य प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. साखरेचा दर आणि शिल्लक साखरेचा मेळच लागत नसल्याने कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. कारखान्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. थकीत कर्जांचा बोजाही यामुळे वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या हंगामावर होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि त्यांच्या संघटना हे वास्तव कळत असल्याने अजून तरी शांत आहेत. मात्र सरकारने आता वेळ दवडून चालणार नाही. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय, राज्य साखर संघांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी झालेली बैठक सकारात्मकच म्हणावी लागेल. बहुसंख्य कारखानदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे असल्याने साखर कारखानदारीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. मात्र निवडणुका तोंडावर आल्याने हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांना शिष्टमंडळाने भेटण्याचा निर्णय झाला. कारखान्यांकडून विक्री केल्या जाणाऱ्या साखरेस क्विंटलला ३२०० रुपये देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. यावर पंतप्रधानच काय तो निर्णय घेऊ शकतात. याशिवाय इथेनॉलला दरवाढ, त्यावरील जीएसटीची कपात, साखर निर्यातीला अनुदान, या काही प्रमुख मागण्याही आहेत. सरकारने आतातरी राजकारणाची झूल उतरवून साखर धंद्याला बूस्ट द्यावा. प्रश्न कारखानदारांचा तर आहेच, त्याहून अधिक तो सामान्य आणि अडचणीतील शेतकऱ्यांचा आहे!
Recent Posts
नवीन पेराई सत्र में गन्ना खरीद का भुगतान 14 दिन में किया जाए: पंचायत...
लखीमपुर खीरी : खंभारखेड़ा चीनी मिल के सामने सोमवार को आयोजित पंचायत में किसानों ने कहा कि, इस नवीन पेराई सत्र में गन्ना खरीद...
उत्तर प्रदेश: कांग्रेस की 500 रुपये प्रति क्विंटल गन्ना मूल्य के लिए पांच नवंबर...
मुजफ्फरनगर : किसानों को 500 रुपये प्रति क्विंटल गन्ना मूल्य दिलाने और कर्ज माफी की मांग के लिए कांग्रेस ने पांच नवंबर को जनसभा...
पुणे : भाडेकरूंचे वर्तन कारखाना हिताविरोधात असल्याचे सोमेश्वर कारखाना व्यवस्थापनाचा आक्षेप
पुणे : गेल्या कित्येक महिन्यांपासून सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि स्थानिक व्यावसायिकांत वारंवार बैठका होत आहेत. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही. कारखान्याने सहकार्याची भावना...
દીપડાના ભયને કારણે ખાંડ કમિશનરે મિલોને સલામતીના પગલાં અમલમાં મૂકવાનો નિર્દેશ આપ્યો
પુણે: મહારાષ્ટ્રના શેરડી ઉત્પાદક પ્રદેશોમાં વધતા માનવ-ચિત્તા સંઘર્ષને ધ્યાનમાં રાખીને, રાજ્યના ખાંડ કમિશનરે તમામ સહકારી અને ખાનગી ખાંડ મિલોને વર્તમાન કાપણીની મોસમ દરમિયાન શેરડીના...
બ્રાઝિલમાં વિટોરિયા-મિનાસ રેલ્વે પરના એન્જિનોમાં ઇથેનોલનો ઉપયોગ પરીક્ષણ કરવામાં આવશે
સાઓ પાઉલો: વેલે અને લોકોમોટિવ ઉત્પાદક વાબ્ટેકે ડીઝલ અને ડીઝલ અને ઇથેનોલના મિશ્રણ બંનેનો ઉપયોગ કરી શકે તેવા ડ્યુઅલ-ફ્યુઅલ એન્જિન પર અભ્યાસ વિકસાવવા માટે...
પંકજા મુંડેની આગેવાની હેઠળની ખાંડ મિલ શેરધારકોને જાણ કર્યા વિના વેચાઈ: ખેડૂત નેતાનો દાવો
છત્રપતિ સંભાજીનગર: ખેડૂત સંગઠનના એક અધિકારીએ આરોપ લગાવ્યો છે કે વૈદ્યનાથ સહકારી ખાંડ મિલ તેના પ્રમુખ અને મહારાષ્ટ્રના મંત્રી પંકજા મુંડેની મંજૂરીથી શેરધારકો અને...
सातारा : खटाव तालुक्याला उच्चांकी ऊस दर मिळवून देण्याचे राजू शेट्टी यांचे आश्वासन
सातारा : यंदा ऊस दराची काळजी करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी ऊस दर मिळवून देईल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते...