भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात ४० बेसिस पॉईंटची वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आता हा दर ४.४ टक्के असेल. तर सीआरआर .५० टक्के वाढ करण्यात आली असून तो आता ४.५ टक्के झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी ही घोषणा केल्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये जवळपास ११०० अंकांची घसरण झाली आहे. आरबीआयचा हा आश्चर्चजनक निर्णय यूएस फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षीत दर वाढी पूर्वी समोर आला आहे. याद्वारे आरबीआयने घाऊक महागाई दर कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
याबाबत इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयच्या पतधोरण समितीने २ मे आणि ४ मे रोजी एक ऑफसायकल बैठक घेतली होती. आरबीआय गव्हर्नर दास यांनी सांगितले की, केंद्रीय बँकेच्या पतधोरण समितीने सर्वसंम्मत्तीने ४० बीपीएस रेपो दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईला आळा घालण्याचा हा प्रयत्न आहे. यूएस फेडरल रिझर्व्हकडून उच्चांकी महागाईला आळा घालण्यासाठीव्याज दरात ५० अंकांच्या आधारावर वाढ केली जाऊ शकते.