बीपीसीएल तेलंगणात १००० कोटींची गंतवणूक करून उभारणार इथेनॉल प्लांट

हैदराबाद : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तेलंगणामध्ये प्रती दिन ५ लाख लिटर इथेनॉल उत्पादन प्लांट सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे. बीपीसीएलने राज्य सरकारला सांगितले की, फर्स्ट जनरेशनच्या खाद्यान्नावर आधारित इथेनॉल प्लांटसाठी पाण्याच्या सोयीसह १०० एकर जमिनीची गरज आहे. प्लांटसाठी दररोज सुमारे ४००० किलो लिटर पाण्याची गरज भासेल. बीपीसीएलचे जैवइंधन विभागाचे कार्यकारी संचालक अनुराग सरावगी यांनी ही माहिती दिली.

राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रकातून दिलेल्या माहितीनुसार, अनुराग सरावगी यांच्या नेतृत्वाखालील बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय पथकाने तेलंगणा उद्योगाचे मुख्य सचिव जयेश रंजन यांच्याशी चर्चेवेळी ही माहिती दिली आहे. सरावगी यांनी सांगितले की, जून २०२१ मध्ये निती आयोग आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने (एमओपीएनजी) जारी केलेल्या निर्देशानुसार २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पाहता बीपीसीएल तेलंगणामध्ये धान्यावर आधारित ५०० किलो लिटर प्रती दिन क्षमतेचा १ जी इथेनॉल प्लांट सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

रंजन यांनी बीपीसीएलला सांगितले की, राज्य सरकार या युनिटसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास तयार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here