ब्राझील: सप्टेंबरमधील जोरदार पावसामुळे ऊस गाळपात घट

साओ पाउलो : सप्टेंबरच्या दुसऱ्या सहामाहीत ब्राझीलच्या मध्य-दक्षिण विभागात ऊसाचे २५.२९ मिलियन टन गाळप झाले आहे, असे Unica उद्योग समुहाने म्हटले आहे. यंदाच्या जोरदार पावसामुळे एक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत गाळपात २९.७ टक्क्यांची घट झाली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस साखरेचे उत्पादन २७.३ टक्क्यांनी घसरून १.७ मिलियन टनापर्यंत पोहोचले. तर इथेनॉलचे उत्पादन २८.६ टक्के घटून १.४२ बिलियन लिटर झाले. Unica उद्योग समूहाच्या या इथेनॉल उत्पादन डेटामध्ये मक्यापासून तयार करण्यात आलेल्या इंधनाचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here