ब्राजीलमध्ये कारखान्यांचा इथेनॉल उत्पादनावर अधिक जोर

साओ पाउलो : ब्राजीलमधील उद्योग समुह यूनिका ने मंगळवारी सांगितले की, ब्राजीलच्या दक्षिण केंद्रात कारखान्यांचे इथेनॉल उत्पादन वाढले असून, साखर उत्पादन घटले आहे. मुख्य ब्राजीलियाई साखर पट्टयात नोव्हेंबर च्या सुरुवातीला 786,000 टन साखरेचे उत्पादन केले, जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 11 टक्के कमी आहे, पण इथेनॉलचे उत्पादन 19 टक्क्यांनी वाढून 1.29 बिलियन लीटर झाले आहे.

साखर उत्पादनासाठी कारखान्यांनी नोव्हेंबरपूर्वी 15 दिवसात केवळ 28 टक्के ऊसाचे वाटप केले, तर गेल्या हंगामात यावेळी 34 टक्के ऊस साखर उत्पादनासाठी वाटण्यात आला होता. कंपन्या जैव इंधनावर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचा हा संकेत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घटत्या किमतींनी ब्राजील ला इथेनॉलच्या उत्पादनासाठी अधिक जोर देण्यास मदत केली आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने किमती कमी केल्या आहेत आणि कारखाने आपल्या आवडत्या इथेनॉल उत्पादनाकडे वळत आहेत. कारण गैसोलीनच्या किमतीत वाढ झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here