ब्राझील: पेट्रोल कर कपातीमुळे इथेनॉलऐवजी साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता

194

साओ पाउलो/न्युयॉर्क : ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्याकडून निवडणुका लक्षात घेवून पेट्रोलच्या करामध्ये कपात केल्याने इथेनॉलच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये घसरण होवू शकते. त्यामुळे साखर कारखाने आपला मोर्चा इथेनॉल उत्पादनावरून साखर उत्पादनाकडे वळवतील, अशी शक्यता आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऊसावर आधारित इथेनॉल विक्रीतील नफा, साखरेच्या तुलनेत कमी झाला आहे. आणि त्यामुळे कारखाने जेवढा शक्य होईल, तेवढा साखर उत्पादनावर भर देतील.

रॉयटर्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, JOB Economy चे विश्लेषक ज्युलिओ मारिया बोर्गेस यांनी सांगितले की, कारखाने आधीच इथेनॉल विक्री करून तोटा सहन करीत आहेत. मग आता ते याचे उत्पादन कशासाठी सुरू ठेवतील ?

ब्राझीलने जर इथेनॉल उत्पादनात गतीने कपात केली आणि साखर उत्पादन वाढवले तर जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती घसरतील, अशी भीती जगभरातील साखर उत्पादकांना सतावत आहे. ब्राझील सरकारने इंधनावरील संघराज्यांचे कर तात्पुरते रद्द केले आहेत. पेट्रोलवर इथेनॉलच्या तुलनेत अधिक कर आकारला जात असल्याने तो कर काढून टाकल्यानंतर पंपावरील इथेनॉलच्या किमतीमध्ये घट झाली आहे.

रॉयटर्समधील वृत्तानुसार, न्युयॉर्क स्थित ब्रोकर पॅरागॉन ग्लोबल मार्केट्स, एलएलसीचे व्यवस्थापकीय संचालक मायकल मॅकडॉगल यांनी सांगितले की, इथेनॉल पेरीटी आधीच १३.७० सेंट प्रती पाऊंड आहे. यापेक्षा अधिक नुकसान काय होऊ शकते ? या तुलनेत ICE वर सोमवारी साखरेचा वायदा बाजार १८.३५ सेंट प्रती पाउंडवर क्लोज झाला. ब्राझीलमधील इथेनॉल दरापेक्षा हा दर ३५ टक्के अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here