ब्राझीलने कोरोना व्हायरसशी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणी हटवली

ब्रासीलिया : ब्राझील सरकारने जवळपास दोन वर्षांपूर्वी कोविड १० महामारी सुरू झाल्यानंतर देशात लागू केलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणी हटविण्यात येत आहे, अशी घोषणा ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो क्विरोगा यांनी केली आहे. गेल्या २४ तासात ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसमुळे १९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यासोबतच ब्राझीलमध्ये COVID-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६,६२,०११ झाली आहे. ब्राझील कोरोना व्हायरस बाबतच्या घातक घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा घटनांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानांवर आहे. तर कोरोनाबाबतच्या नोंदणीकृत एकूण रुग्णसंख्येत ब्राझील अमेरिका आणि भारताच्या पुढे, तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलने मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सार्वजनिक आणीबाणीची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here