ब्राझील : काही कारखान्यांकडून इथेनॉलचे उत्पादन सुरू

साओ पाउलो : ब्राझीलच्या दक्षिण – मध्य क्षेत्रात अनेक आठवड्यांच्या विश्रांतीनंतर काही कारखान्यांनी जैव इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतीचा लाभ उठवण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन सुरू केले आहे.

ब्राझीलची प्रतिष्ठीत Unica उद्योग समुहाने म्हटले आहे की, गॅसोलीनच्या सोबत स्पर्धा करणाऱ्या हायड्रोस इथेनॉलची विक्री जानेवारी ते फेब्रुवारी या काळात २६ टक्क्यांनी वाढली आहे. युनिकाचे तांत्रिक संचालक अँटोनियो डी पडुआ रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, जानेवारीपासून विक्रीत वाढ झाल्याने ब्राझीलमध्ये जैव इंधनाच्या बाजारपेठेत सुधारणांचे संकेत मिळाले आहेत. देशातील कार मालकांकडून इथेनॉलची मागणी वाढली आहे. कारण पेट्रोलच्या किमती आता उच्चांकी स्तरावर आहेत. ब्राझीलमध्ये बहुतांश कार फ्लेक्सिबल इंजिनमुळे गॅसोलीन अथवा इथेनॉलवर चालतात. त्यामध्ये चालकांकडून पंपावर सर्वात किफायतशीर इंजिन निवडले जाते.

ब्राझीलची तेल कंपनी पेट्रोब्रासने गेल्या आठवड्यात जागतिक ऊर्जा किंमतीमधील वाढ पाहता गॅसोलीनच्या दरात १९ टक्क्यांची वाढ केली आहे. ब्राझीलमध्ये अधिक इथेनॉलच्या विक्रीमुळे साखर उत्पादनात घट होऊ शकते. ब्राझीलमध्ये ऊसाचे नवे पिक एप्रिल महिन्यापासून तयार होते. मात्र, काही कारखान्यांनी ऊस तयार असल्याने आणि दराचा फायदा उचलण्यासाठी आतापासूनच गाळप सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here